सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (07:53 IST)

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांनी शिक्षणासाठी तातडीने येथे अर्ज करावेत

कोविड-19 संसर्गामुळे एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांनी शैक्षणिक मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, नाशिक येथे अर्ज सादर करावेत, असे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी अजय फडोळ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
 
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधी अंतर्गत बालकांचे शालेय शुल्क, वसहतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी या कारणांसाठी एकदाच मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी आपले तपशिलासह परिपूर्ण अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात नासर्डी पुलाजवळ, समाज कल्याण परिसर, नाशिक पुणे रोड, नाशिक क्लब समोर, नाशिक या ठिकाणी सादर करावेत, असे आवाहनही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ यांनी केले आहे.
 
तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समन्वय समिती, लाभार्थी व पालकांना संपर्क करून या निधीबाबत कळविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत या कार्यालयात 522 अर्ज प्राप्त झाले असून त्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. फडोळ यांनी केले शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.