1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (12:08 IST)

अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात

The process of filling online application for 11th admission starts from today अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात
अकरावीसाठी प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आज पासून मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात सुरु होत आहे. तसेच प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि अर्जाचा एक भाग भरण्याची सुरुवात आजपासून होत आहे. या साठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवून अकरावी प्रवेशाचा भाग 1 साठी ऑनलाईन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्राची निवड करायची आहे.  तर दहावीचा निकाल आल्यानन्तर विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग 2भरायचा आहे.  
 
अर्ज भाग 1 कसा भरायचा? जाणून ह्या 
 
* अकरावीसाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे.
* लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग 1 भरायचा आहे.
* ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करायचा.
* अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचं आहे.
* मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यायचा आहे.