1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (11:29 IST)

जितेंद्र आव्हाडांची गाडी वाहतूक मध्ये अडकली, पोलिसांनी जीपवाल्याला कानशिलात लगावली!

Jitendra Awhad's car got stuck in traffic
सध्या रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणं काही नवीन नाही. कोल्हापुरात वाहतूक कोंडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोल्हापूर दौऱ्यात असताना त्यांच्या वाहनाचा ताफा वाहुतकोंडीत अडकला. यावेळी वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागत होते. आव्हाडांच्या वाहनाला वाट करून देण्यासाठी पोलिसांनी एका वाहनचालकांच्या कानशिलात लगावली.
 
आव्हाड हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर असून अंबाबाईच्या दर्शनासाठी जात होते. त्यांच्या वाहनाचा ताफा या वेळी एका चौकात अडकला. त्यांच्या वाहनाला वाहतुकीतून काढण्यासाठी पोलिसांना दमछाक करावी लागली. या वेळी एका पोलिसाने एका वाहनचालकांवर संतापून हात उगारण्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.