वाचा, राज्य सरकारकडून जाहीर झालेली नवी नियमावली
कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू केले. पण नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसताय. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने उद्या अर्थात बुधवारपासून नवी नियमावली जाहीर करत निर्बंध अधिक कडक केले आहेत. या नव्या नियमांनुसार किराणा दुकानासह सर्व खाद्य पदार्थ आणि चिकन-मटणाची दुकानं सकाळी 7 ते ११ पर्यंतच सुरू राहणार आहेत. खाद्य पदार्थांची होम डिलिव्हरी मात्र रात्री 8 वाजल्यापर्यंत सुरू राहणार आहेत. काल राज्य सरकारने निर्णय घेण्यात आला होता. आज यासंदर्भातील आदेश काढले आहेत.
काय आहेत नियम ?
किराणा दुकानासह सर्व खाद्य पदार्थ दुकानेही सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील.
होम डिलिव्हर सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहील, परंतु स्थानिक प्रशासन यामध्ये बदल करू शकते
किरणाबरोबर यात भाजी, फळे, बेकरी, दूध डेअरी, चिकन, अंडी, मटण, मासे याची विक्री करणाऱ्या सर्व दुकानांचा समावेश
राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, फिश सह), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील.
मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत डोम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.