1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (21:48 IST)

कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री

Covishield vaccine plant completely safe: CM say At the press conference Serum CEO Adar Poonawala
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली. 
 
“आशेचा किरण लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली आमि सर्वांच्याच काळजाचा ठेका चुकला. दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे. आग लागली तेथील दोन मजले वापरात होते. वरील ठिकाणी जिथं केंद्र सुरु होणार होतं तिथे आग लागली. सर्वांना जी एक शंका आणि भीती वाटत होती. मात्र कोरोना लसीला कोणताही फटका बसलेला नाही,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
 
“आगीची सखोलपणे चौकशी केली जात आहे. अहवाल येत नाही तोवर निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ अदर पूनावाला देखील उपस्थित होते. बीसीजीसह इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून आमचे जे नवे प्रोडक्ट्स येणार होते त्यांच्या वरही प्रभाव पडल्याचं ते म्हणाले आहेत.