1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (21:40 IST)

सॅमसंग मोबाईलचा स्फोट, २० दिवस आधी घेतला होता फोन

mobile phone exploded in washim
वाशिम जिल्ह्यात सॅमसंग मोबाईलचा स्फोट झाला. लोणी गावच्या प्रदीप बोडखे यांचा हा मोबाईल असल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात मोबाईलची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. 
 
या घटनेमध्ये प्रदीप बोडखेंनी डिसेंबर 2020 मध्ये F 41 सॅमसंग मोबाईल फ्लिपकार्टवरुन विकत घेतला होता. जवळपास 20 दिवस मोबाईल चांगला चालला. त्यानंतर  प्रदीप  मोबाईलवर बोलत असताना अचानक मोबाईल गरम झाला. मोबाईल इतका तापला की त्यांनी तो जमिनीवर फेकला. जमिनीवर पडल्या-पडल्या मोबाईलचा स्फोटा झाला . दैव बलवत्त म्हणून प्रदीप यांनी योग्य वेळी मोबाईल फेकला नाहीतर त्यांच्या हाताला आणि कानाला इजा झाली असती.