शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (15:34 IST)

एचएएलच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दोन तोतयाविरुद्ध गुन्हा, एकास अटक

नाशिकमधील ओझर  येथील एचएएलच्या प्रतिबंधित क्षेत्रात बनावट ओळखपत्र बाळगून कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवत फिरणाऱ्या नाशिक येथील एकासह पालघरच्या विक्रमगड येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका संशयिताला ओझर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
मनोज पाटील उर्फ अबू हसन सलीम पठाण (३७, सारडा सर्कल नाशिक), व हर्षल रमेश भानुशाली (विक्रमगड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बनावट ओळखपत्रे बनवून देणारा मुख्य आरोपी पडद्याआड असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे.
उपअधिक्षक अर्जुन भोसले, निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे शोष पथकाचे अनुपम जाधव , किशोर अहिरराव, विश्वनाथ धारबळे, दीपक गुंजाळ, जितेंद्र बागुल तसेच ओझर पोलीस स्थानकामार्फत दोंघा संशयितांविरुद्ध ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.