रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (16:29 IST)

महिलेला आधी पाठवले वर्षभर अश्लील मेसेज नंतर अंतर्वस्त्र त्याला गोव्यातून अटक

मुंबई येथे राहणाऱ्या चर्चगेट परिसरातील ३३ वर्षीय महिलेला अंतर्वस्त्र गिफ्ट म्हणून पाठवणाऱ्या ३६ वर्षीय आरोपीला गोव्यातून पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी भारतीय पुरातत्त्व विभागात नोकरी करतो आणि या अगोदर त्याने मेसेजवरून पीडित महिलेला अश्‍लील व्हाईस मेसेज देखील पाठवला आहे. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रदोष रामकृष्ण नाईक (३६) असं अटक केलेल्या आरोपीचं नावं आहे.
 
या प्रकरणातील ही पीडित ३३ वर्षीय महिलेला १५ जून रोजी राहत्या घरी पोस्टाने एक पार्सल आले. त्यावर इंग्रजी भाषेमध्ये स्पेशल गिफ्ट फॉर यु विशेष गिफ्ट पाठवले आहे असे लिहिले होते. यातील तीन पॅन्टीज फक्‍त तुझ्यासाठी, मला विश्‍वास आहे तुला आवडतील, प्लीज त्या घाल असा अश्‍लील संदेश नमूद केलं होता. प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने पोस्टात चौकशी केली असता ते काळबादेवी येथून आले हे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकारामुळे मनात लज्जा उत्पन्न झाल्यामुळे या महिलेने याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली. पोस्टाकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी प्रदोष रामकृष्ण नाईक (३६) याला गोव्यातील फोंडा परिसरातून अटक केली आहे. तपासात आरोपीचे नाव पुढे आल्यानंतर वर्षभरापासून महिलेला मेसेजवरून त्रास देणारा हाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.