मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (15:32 IST)

शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रादरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि आमदार नारायण राणेंसह शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कणकवलीत काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली होती.यावेळी राणेंचे स्वागत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.तसेच नरडवे नाका येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजीही केली होती.यावेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवरगुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
सिंधुदुर्गात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना आमदार वैभव नाईक,माजी खासदार निलेश राणे यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गुन्हे दाखल झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आमदार वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश पारकर,अतुल रावराणे,नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह कुडाळ,मालवण व कणकवली तालुक्यातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.