शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 5 जुलै 2021 (12:36 IST)

पाऊस नसल्याने शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचं संकट

पावसाळा असून देखील सध्या पाऊस होत नाही पावसानं दांडी मारल्यावर राज्यातील 6 जिल्हे दुष्काळाला सामोरी जात आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचं संकट समोर आले आहे.
 
राज्यातील औरंगाबाद, बीड,नंदुरबार,नाशिक,अकोला,धुळे हे  जिल्हे दुष्काळाला समोरी जात आहे या मुळे इथल्या शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे.जून महिन्याच्या सुरुवातीस पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे 27 टक्के पेरण्या झाल्या होत्या.नंतर पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरीं समोर दुबार पेरणीचं संकट आले आहे. 
 
हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा,पूर्वी विदर्भ या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आले आहे.
 
तसेच पुणे,सातारा,सांगली, कोल्हापूर,सोलापूर,अहमदनगर,बीड,जालना, उस्मानाबाद,लातूर,परभणी,नांदेड, हिंगोली,नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो.अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.