ठाणे येथे प्रवासी बस मध्ये पाण्यातील मगरी, काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
तस्कर कोणत्या गोष्टीचा कसा वापर करतील हे शोधणे पोलसांपुढील मोठे असे आवाहनाच आहे. आता ठाणे येथे अशीच एक कारवाई तस्करांवर केली आहे. झाले असे की खाजगी प्रवासी बसमधून दुर्मिळ मगरींच्या वाहतूकीचा भांडाफोड ठाणे वनक्षेत्रपाल पथकाने केला असून, छोट्या दोन मगरींसह तीघांना त्याब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्तात असाकी, खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या डिकीमधून मगरींची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती वनक्षेत्रपात पथकाला मिळाली. या माहितीच्या आधार ठाणे वनक्षेत्रपाल पथकाने ठाण्याकडून बोरोवलीकडे जाणाऱ्या एमएच 12 क्यूडब्ल्यू 9617 या बसची अचानक धाड टाकत तपासणी केली. यावेळी पथकाला त्या बसच्या डिकीमध्ये 2 जिवंत मगरी सापडल्या आहेत. प्रकरणी वन विभागाच्या पथकाने बस चालक मोहंमद अब्दुल रहीम हाफिज (वय : 33, राहणार-बंडलगुडा, हैद्राबाद) यांच्यासह खुद्दुस लतीफ बैग (वय-38, राहणार औराड, जिल्हा, बिदर, कर्नाटक), शिवाजी जी बलाया (वय : 28, हैद्राबाद) या तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता, त्यांनी मगरीची तस्करी करीत असल्याची कबुली दिली आहे. त्यांनी या मगरी कोठून आणल्या व कोणास विक्री करणार होते याची चौकशी सुरू असल्याची माहिती उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी पुढारीला दिली आहे.