रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मे 2019 (16:51 IST)

राजभवनातील चहापान, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

गडचिरोली येथे बुधवारी पोलिसांवर झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी संध्याकाळी राजभवन येथील चहापान व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला आहे. राज्यपालांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे मान्यवर निमंत्रितांसाठी तसेच विविध देशांच्या प्रतिंनिधींसाठी चहापान तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोलीमध्ये नक्षलावाद्यांनी घडवून आणलेल्या भू-सुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या गाडीला निशाणा करून स्फोट घडवून आणला.