शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जून 2018 (15:21 IST)

नीरव मोदी यांचे रद्द झालेल्या पासपोर्टवर बिनदिक्कतपणे परदेशवाऱ्या

निरव मोदीला पकडण्यासाठी भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला मात्र अजूनही यश मिळत नाहीये. तर दुसरीकडे नीरव मोदी रद्द झालेल्या पासपोर्टवर बिनदिक्कतपणे परदेशवाऱ्या करत असल्याची माहिती उघड झाले आहे. त्यामुळे हा प्रकार असा काय असू शकतो यावर तपास सुरु आहे. भारतीय तपासयंत्रणांना. इंटरपोलने यासंदर्भात माहिती दिली आहे. 24 फेब्रुवारी रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला होता. नीरवने चारवेळा हा पासपोर्ट वापरला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे सरकार खर्च प्रयत्न करत का असा प्रश्न समोर आला आहे.  या पासपोर्टचा शेवटचा उपयोग मार्च महिन्यात त्याने केला होता. भारतीय तपासयंत्रणांना इंटरपोलने 5 जून रोजी यासंदर्भात पत्र पाठवून माहिती दिली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि हाँगकाँग या देशांमध्ये त्यानुसार नीरवने 15 मार्च ते 31 मार्च या काळात प्रवास केला आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी निरव मोदी पळून गेला आहे.