केरळमधील दाम्पत्याने सरकारला केली तीन कोटींची संपत्ती दान
गेली कित्येक वर्षे निवृत्त शिक्षक असलेल्या एन कलासन (व 77) आणि सी.के. सरोजिनी (व 71) यांना मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलीचे काय होईल, कोण तिची देखभाल करेल अशी काळजी त्यांना सतावत होती. पण अखेर त्यांना या प्रश्नाचे उत्तर सापडले. दाम्पत्याने आपले घर केरळ सरकारला दान केले असून, या घराचे रूपांतर असक्षम महिलांचा सांभाळ करणार्या पुनर्वसन केंद्रात व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.