बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जून 2018 (09:06 IST)

‘काला’या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू १०० कोटी पूर्ण

सुपरस्टार रजनीकांत यांची लोकप्रियता कोणीही तोडू शकले नाहीत. तेच पुन्हा दिसून आले आहे. यात अवघ्या तीन दिवसात काला ने रेकोर्ड ब्रेक कमाई केली आहे. ‘काला’या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू करत १०० कोटीची कमाई पूर्ण केली आहे. हा चित्रपट पहायला चाहत्यांनी उड्या घेतल्या आहेत. अनेक शो अजूनही हावूसफुल आहेत. सिनेव्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरवरून या सिनेमाने जगभरात शंभर कोटी केली असून, आपल्या देशासह जगभरात  चांगली कमाई केली आहे. दक्षिण भारतात  चेन्नईत येथे पहिल्या दिवशी सिनेमाने सर्वाधिक म्हणजे १.७६ कोटींची ओपनिंग मिळवली. अमेरिकन बॉक्स ऑफिसवर ६.८५ कोटीची कमाई, ‘वीरे दी वेडींग’,‘भारत अने नेनू’,‘कॅरी ऑन जट्टा २’या सिनेमांना ऑस्ट्रेलियात कालाने आधीच धूळ चारली आहे. तेलगू, तमीळ आणि हिंदी भाषेत १४० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने सॅटेलाइट हक्क विकून आधीच २३० कोटींची कमाई केली असून या  चित्रपटात रजनीकांत सोबत सुपरस्टार नाना पाटेकर सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट अजून आकर्षक आणि उत्तम झाला आहे.