मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (13:32 IST)

पंढरपूरमध्ये कर्फ्यू राहणार, पोलीस प्रशासनाकडून आदेश जाहीर

पंढरपूरमध्ये २४ नोव्हेंबर रात्रीपासून २६ रात्री १२ पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. या दरम्यान नागरिकांना संचारबंदी करण्यात आलीय. एसटी बस देखील थांबवण्यात आल्यायत. पोलीस प्रशासनाने हा आदेश जाहीर केलाय.कार्तिकी एकादशीला देशातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशावेळी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे. हे पाहता पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. 
 
कोरोना काळात १०० पोलीस अधिकारी, १२०० कर्मचारी, एक एसआरपीएफचे यूनिट आणि ४०० होमगार्ड मिळून एकूण १७०० जण तैनात केले जाणार आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे मंदिर असून २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कार्तिक एकादशीचा शुभ मुहूर्त आहे.