1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जानेवारी 2021 (09:13 IST)

सीरम विरोधात पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात खटला दाखल

Cutis biotech a nanded based pharmaceutical company has filed a suit against serum institute-of-india
नांदेडमधील क्युटिस बायोटेक या औषध कंपनीने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया विरोधात पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. सीरमने कोरोना व्हायरसविरोधात बनवलेल्या लसीला ‘कोव्हिशिल्ड’ असे नाव दिले आहे. सीरमने त्यांच्या लसीसाठी ‘कोव्हिशिल्ड’ या नावाचा वापर करु नये, यासाठी क्युटिस बायोटेकने हा खटला दाखल केला आहे.
 
‘कोव्हिशिल्ड’ या नावाच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी आम्ही आधीच एप्रिल २०२० मध्ये अर्ज केला होता. ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने कंपनीने वेगवेगळया उत्पादनांची निर्मिती करुन, बाजारात त्यांची विक्री केली आहे असे क्युटिस बायोटेकने म्हटले आहे.