शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (09:37 IST)

पोषक पर्जन्यमान व वातावरण असल्याखेरीज सोयाबीनची पेरणी होऊ नये याची दक्षता घ्या - दादा भुसे

dada bhuse
राज्यात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असून, त्याच्या पेरणीची घाई गडबड होण्याची शक्यता असल्याने पोषक पर्जन्यमान व वातावरण असल्याखेरीज सोयाबीनची पेरणी होऊ नये याची दक्षता कृषी विभाग व शेतकऱ्यांनीही घ्यावी, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
 
महाराष्ट्रात अजूनही मोसमी पावसाचे आगमन झालेले नाही. पाऊस लांबणे किंवा अपुरा कोसळणे अशा शक्यता गृहीत धरून पेरणीचे नियोजन व्हावे.
 
सलग तीन दिवसात किमान 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याखेरीज पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे. साताऱ्यात कृषी आढावा बैठकीत खरीप हंगाम नियोजनाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना ते बोलत होते.