शरद पवारांच्या काळातच दाऊद इब्राहिम उदयाला आला - गुणरत्न सदावर्ते
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची जीभ घसरली आहे. त्यांनी गलिच्छ भाषेत शरद पवारांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आम्ही संपवणार आहोत. त्यासाठी आम्ही उद्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि बैठका घेणार आहोत, असं गुणरत्न सदावर्ते यांनी जाहीर केलं आहे. पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.
पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आता हे नवीन काय आहे? म्हणे शरद पवारांना धमकी दिली आहे. पण त्यांना नेमकी धमकी कुणी दिली. शरद पवारांच्या काळातच दाऊद इब्राहिम उदयाला आला आहे. शरद पवारांचा जो वैचारिक व्हायरस आहे, तो व्हायरस आम्ही संपवणार आहोत. येणाऱ्या काही दिवसांत आम्ही महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आणि त्यांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेणार आहोत. ती रॅली उद्यापासून आम्ही काढणार आहोत.”
Edited By- Ratnadeep Ranshoor