सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 एप्रिल 2023 (09:55 IST)

वीज पडून वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू

lighting strike
राज्यभरात तसचे देशात अवकाळी पावासाने थैमान मांडला आहे. अशात निलंगा तालुक्यातील मुबारकवाडी तंद्यवरील 11 वर्षीय मुलगी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असताना वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरुषी असे मृतक मुलीची नाव आहे.
 
तर नेवासा तालुक्यातील म्हसले येथे शुक्रवारी सकाळी वादळी वार्‍यासह पावासाने हजेरी लावली. दरम्यान वीज पडून 10 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. साई राजेंद्र शिरसाठ याचे  नाव आहे. तर बुधवारी श्रीरामपूर येथे वादळी वार्‍यासह शेतात वीज पडल्याने दोन जणांचा मृत्यू तर एक महिला जखमी झाल्याची बातमी आहे. येथे 10 घरांचे नुकसान झाल्याचे  ही सांगण्यात येत आहे.
 
तर हरी जवळगा येथील रतन गिरी यांच्या शेतात बांधलेल्या तीन बैलांवर वीज कोसळून ते दगावल्याची घटना घडली आहे.