सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (10:49 IST)

Satara Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा मृत्यू

accident
Satara Accident: सातारा जिल्ह्यातील सूर्याचीवाडी गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे.  देवदर्शनासाठी निघालेल्या 4 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Satara Police) घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले होते. मात्र गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी आणि पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
 
मायणी-दहिवडी मार्गावरील धोंडेवाडी ते सूर्याचीवाडी दरम्यान मारुती ओमनी गाडीचा अपघात होऊन तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. ओमनी गाडी झाडावर आदळल्याने तीन जण जागीच ठार झाले. तर अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यातील एकाच रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गाडीतील सर्व प्रवासी कुरोली व बनपुरी येथील रहिवासी होते. बाळू मामाच्या मेंढराचे देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला आहे.