बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 11 मार्च 2024 (14:50 IST)

पंत प्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

narendra modi
पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज देखील उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. खलिस्तान संघटनेने धमकी देण्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की मला आज अकाली 11:18 वाजेच्या सुमारास एका क्रमांकावरून फोन आला या कॉल वर युनाइटेड किंग्डम असे नमूद केले असून या कॉल मध्ये स्वतःला खालिस्तान समर्थक दर्शवून पंत प्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या फोन कॉल चा तपास लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पूर्वी सहा दिवसांपूर्वी देखील पंतप्रधान मोदींना जीवे करण्याची धमकी देण्यात आली होती. 
 
कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सहा दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. 
 
केंद्रात काँग्रेसचे सरकार आले तर पंतप्रधान मोदींना मारून टाकू, अशी धमकी आरोपीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओमध्ये आरोपी तलवारही फिरवताना दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्धगुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हैदराबाद, यादगिरी जिल्ह्यात पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. 
 
पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एनआयएला धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या ईमेलमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती.
 
Edited by - Priya Dixit