शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (17:16 IST)

शाळा सुरु होणार? दोन दिवसात कळेल

कोरोनाने मांडलेल्या तांडवामुळे गेल्या दीड वर्षांपासून मुलांनी शाळेचं तोंड देखील बघितलं नाहीये. कोरोना महामारीमुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत अर अजूनही संसर्गाचा धोका टळलेला नाहीये. त्यामुळे शाळा, कॉलेजेस गेल्या दीड वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जातं आहे. 
 
मात्र आता कोरोनाचं प्रमाण कमी होत असताना सर्व निर्बंध शिथिल होऊ लागले असून हळूहळू दुकानं, मॉल्सही, गार्डन इतर सुरु करण्यात आले असली तरी शाळा कधीपासून सुरु होणार हा प्रश्न पालकांना पडला आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माहिती देत सांगितलं की येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल.
 
बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली की राज्य सरकार शाळा सुरु करण्याचा विचार करत आहे. मात्र इतर राज्यांमध्ये कोरोना प्रभाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
 
ते म्हणाले की शाळा करण्याबाबत विचार करताना आधी राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेतली जाईल. तसंच कोरोना टास्क फोर्सच्या सूचनांकडेही लक्ष देऊन त्यानुसार SOP मध्ये बदल केले जातील.