शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (15:56 IST)

पूरग्रस्त भागात डाळ आणि तांदुळ देण्याचा निर्णय

राज्य सरकारने आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्त भागात डाळ आणि तांदुळ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.आतापर्यंत तांदुळ,गहू देण्यात येत होते.पण दळण करण्याची अडचण पाहता तांदूळ आणि डाळी देण्यात येणार आहे.जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत पूरासारख्या भागात अडकलेल्या नागरिकांना खिचडी करून खाता येईल हा त्यामागचा उद्देश आहे.त्यासोबतच रॉकेलही नागरिकांना अन्न शिजवण्यासाठी देण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलून हा निर्णय झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासोबतच शिवभोजन थाळीची केंद्रही अशा आपत्कालीन किंवा पूरग्रस्त भागात उभारण्याचा निर्णय झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
 
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ यांच्यासोबत झालेल्या चर्चेननंतर डाळ, तांदूळ आणि केरोसिन शिधेच्या स्वरूपात देण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली.अनेकदा शिधा देताना गहू दिल्यानंतर त्यासाठीचे दळण करण्यासाठी चक्की कुठे शोधायची असा प्रश्न असतो. म्हणूनच डाळ दिल्यास तांदुळ वापरून खिचडी करता येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अशा स्वरूपात शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तसेच शिवभोजन केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जेणे करून शिवभोजन थाळीचा लाभ हा त्याठिकाणच्या नागरिकांना मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने या शिवभोजन थाळी केंद्रासाठी एनजीओला आवाहन केले आहे. एनजीओच्या माध्यमातून ही शिवभोजन थाळीची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.