1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (15:53 IST)

हिरकणी वाडी येथे मोठी दरड कोसळली, संपूर्ण वाडीला धोका

A great pain fell at Hirkani Wadi
रायगड जिल्ह्यातील महाड जवळ किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे मोठी दरड कोसळली असून संपूर्ण वाडीला धोका निर्माण झाला आहे.तिथे कुणाचाही संपर्क होत नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, या गावातील कुटुंबे जवळच्या दुसऱ्या वाडीत सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाली असून किल्ले रायगडावरून येणारे मोठे मोठे दगड गावावर येत आहेत. अनेक घरांना तडे गेले असून ग्रामस्थ प्रचंड भीतीच्या छायेत वावरत आहेत.  
 
ग्रामस्थ मदतीसाठी याचना करीत आहेत, परंतु प्रशासनाशी संपर्कच होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील घरांना लागूनच दरडीचा मोठा भाग प्रचंड वेगाने खाली आला आहे.त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. दरम्यान,आधीच्या दुर्घटनेतील तळीये गावात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बाळाचा मृतदेह बाहेर काढला आहे. मदत आणि बचावकार्य सुरुच आहे. रायगडच्या महाडमधील तळीये गावात दरड कोसळल्याने तब्बल 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे.