आता रुग्णालयावर होणार गुन्हे दाखल
महाराष्ट्रातील असे खासगी रुग्णालयांनी नवीन चलनासाठी आग्रही भूमिका ठेवलीच नाही पाहिजे , तर अतिदक्षता असलेल्या तातडीच्या उपचारांची गरज असणार्या रुग्णांना सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. असे न केल्यास गुन्हा दाखल होणार आहे.
चलनी नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणताही रुग्ण उपचाराशिवाय राहू नये यासाठी सरकारने सर्व संबंधित यंत्रणेला तातडीने आणि संवेदनशीलतेने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तर अनेक खासगी रुग्णालयात झालेल्या अनेक तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या आहेत. तर काही ठिकाणी रुग्णांनी दिलेला धनादेश न वटल्यास तातडीची भरपाई म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रतिरुग्ण 10 हजारापर्यंत प्रतिपूर्ती करण्यात येईल, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे आता जर खासगी रुग्णालयांनी दिरंगाई केली तर लगेच तक्रार केली पाहिजे आणि सोशल मिडीयावर तक्रार करणे गरजेचे आहे.