सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2017 (20:48 IST)

'मी मुख्यमंत्री बोलतोय' तून थेट जनतेशी संवाद

devendra fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीव्हीवरील 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांशी आणि सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. महिन्यातून एक दिवस सह्याद्री वाहिनीसह अन्य मराठी वृत्तवाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार असून त्यातील पहिला भाग चित्रितही झाला आहे. येत्या रविवारी हा कार्यक्रम सर्वांना पाहता येणार आहे. पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने मंत्रालयात नव्याने बांधण्यात आलेल्या स्टुडिओमध्ये या भागाचे चित्रीकरण केले. यातून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून रान उठवणार्‍या विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत.