गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (07:21 IST)

मात्र मी फडतूस नाही काडतुस आहे. झुकेगा नही तो घुसेगा

devendra fadnavis
गांधी सावरकरांचा अपमान करतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. उद्धव, काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू ? उद्धव मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतुस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा.सुधांधु त्रिवेदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का प्रामुख्याने उपस्थित होत्या.
 
जर सावरकर यांनी त्याग केला नाही असे म्हटले जात असतील, तर कुणीच त्याग केला नाही असे म्हणावे लागेल, असे गडकरी म्हणाले. तर खुद्द महात्मा गांधी यांनी सावरकर यांना प्रखर देशभक्त व साहसी म्हटले होते. जे महात्मा गांधी यांना कळले ते आताच्या राहुल गांधी यांना कळाले नाही असे  खा.सुधांधु त्रिवेदी म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor