शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (07:29 IST)

वीज कनेक्शन तोडण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दिले हे आदेश

devendra fadnavis
मुंबई – शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून त्यानुसार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शनिवारी केली.
 
विजय सिंघल म्हणाले की, महावितरणकडून थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम चालू आहे. त्यानुसार ज्यांची बिले थकलेली आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते व बिल भरल्यानंतर पुन्हा जोडले जाते. तथापि, शेतकऱ्यांवर अतिवृष्टी व पूरपरिस्थिती अशी आलेली संकटे आणि सध्या चालू असलेला रब्बी हंगाम ध्यानात घेता त्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश मा. उपमुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानुसार महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor