बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:27 IST)

देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांच्या विरोधात अपप्रचार केल्याशिवाय पर्याय नाही…

rohit panwar
भाजपने शरद पवारांची मदत गुजरातच्या भूकंपावेळी सुध्दा घेतली होती, तेव्हा ते भारताचे पंतप्रधान नव्हते? असा टोमणा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना मारला आहे.
 
तसेच भाजपच्या नेत्यांची अशी राजकीय वक्तव्य करण्याची पद्धत ही आताची नसून, ती फार जुनी आहे. ही भाजपच्या नेत्यांना लागलेली सवय लवकर जाईल अशी काही चिन्ह दिसत नाहीत, अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे.
भाजप नेत्यांकडून केलेल्या वक्तव्यामध्ये शरद पवार हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? या प्रश्नाचे रोहित पवार हे जोरादार प्रत्युत्तर देत म्हणाले की, कोरोनाच्या काळात एकही दिवस घरी न बसता त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात आधार दिला.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा पवार साहेब जनतेमध्ये मिसळून त्यांची मदत करताना दिसतात. मागील दोन वर्षात कोरोनाच्या काळातही इतकं वय झालेला असताना सुध्दा शरद पवारांनी आराम केला नाही.
तर प्रत्यक्ष जनतेत मिसळून त्यांना सहकार्य केलं आहे, आणि जनतेच्या मनात असलेली भीती त्यांनी दूर केली. शरद पवार साहेबांवरती भाजपकडून वारंवार अशा पध्दतीची टीका केली जाते.
पण त्यांच्या टीकेत काहीचं अर्थ नसतो हे जनतेला सुध्दा माहित आहे असेही रोहित पवार म्हणाले आहे. पवार साहेबांची अनेक पक्षांची एकत्र लढण्याची तयार सुरू असल्याचे, रोहित पवारांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना गोव्यात शरद पवारांच्या विरोधात अपप्रचार केल्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीचं नसल्याने ते अशा पध्दतीची टीका वारंवार करत असतात.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, जनमताची चोरी होऊ देणार नाही. त्यावर रोहित पवार हे फडणवीसांना प्रत्युत्तर देत म्हणाले की, त्यांच्याकडे गोव्याची जबाबदारी असल्याने त्यांना अशी अर्थहीन वक्तव्य करावी लागतात.