धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचे भाष्य, पोलिसांनी सत्य बाहेर आणावे
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले हे योग्य नाही, पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावे, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्या दरम्यान व्यक्त केले आहे.
ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.” तसेच, “धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही त्या कबुलीसंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. यातील कायदेशीर बाब, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी या दोघांनीही मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे, असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. पोलिसांनी या संदर्भातील सत्य तत्काळ बाहेर आणावे. एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
राज्यातील राज्यकर्त्यांना आरोप लावण्याची सवय लागली आहे, महाराष्ट्राला कमी प्रमाणात लस मिळाल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगत हा आरोप नाकर्तेपणा लपविण्याचा प्रकार आहे. त्याबरोबरच, कृषी कायदे रद्द करण्या संदर्भात समिती स्थापन केली असून, त्यासंदर्भातील शंका लवकर दूर होतील अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगीतले. तसचे औरंगाबाद शहराच्या नामांतरनाबद्दल संभाजी नगर नामांतरावरुन काँग्रेस शिवसेनेचं मिलिजुली असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.