गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 13 जानेवारी 2021 (23:04 IST)

राज्यात पुन्हा एकदा थंडीचे आगमन होणार, हवामान विभागाची माहिती

weather forecast maharashtra and kokan  maharashtra news maharashtra majaha
राज्यात पुन्हा एकदा थंडीचे आगमन होणार आहे. ढगाळ स्थिती निवळल्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ही शक्यता व्यक्त केलीय. अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्याच्या बहुतेक भागांत गेल्या आठवडय़ात ढगाळ वातावरण होतं. मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागांत काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरीही लावली. या वातावरणानंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ होऊन थंडी पूर्णपणे गायब झाली होती. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये एक-दोन दिवसांत थंडीची लाट येणार आहे.

ढगाळ स्थिती निवळल्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे उत्तरेकडील काही राज्यांमध्ये एक-दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीटी लाट येण्याची शक्यता आहे.