1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जुलै 2023 (07:26 IST)

देवाची गादी चालवणाऱ्या महिलेचा भक्तांकडून जीवे ठार मारले

नाशिक:- देवाची गादी चालवणाऱ्या महिलेकडून फसवणूक झाल्याच्या कारणावरून भक्त असलेल्या एका युवकाने गादी चालवणाऱ्या महिलेच्या गळ्यावर चाकू ने वार करून जीवे ठार मारले. भर दिवसा झालेल्या प्रकाराने शिंदेगाव व पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरस ताब्यात घेतले.
 
या बाबत पोलिसांनी सांगितले अशी की,जनाबाई भिवाजी बर्डे (वय४५)राहणार शिवरत्न चौक, शिंदे गाव ही महिला देवाची गादी चालवते असे भासवून अनेक लोकाच्या दुखात मार्ग सांगत असे. त्या मुळे अनेक नागरिक या महिलेकडे “बाहेर चे पाहण्यासाठी”तिच्या कडे येत होते. अनेक दिवसांपासून निकेश दादाजी पवार हा युवक तिच्या कडे समस्या घेऊन येत होता, मात्र त्याला त्याने समाधान होत नसल्याने तो अस्वस्थ होता.
 
शुक्रवारी दुपार च्या सुमारास संशयित निकेश पवार हा या महिलेच्या घरी गेला, जरा वेळ बसला आणि तिची नजर चुकवून जवळ असलेल्या चाकू ने जनाबाई बर्डे हिच्या मानेवर व शरीरावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने व वार उर्मी लागल्याने जनाबाई बर्डे या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
जनाबाई निचपीत पडल्याने हल्लेखोर निकेश हा चाकू हातात घेऊन पळू लागला. जनाबाई हिच्या मावस बहीण रंजना माळी यांनी घटना पाहून हल्लेखोरांचा ओरडत मागे धावली, लोक ही त्याला पकडू लागले मात्र तो महामार्गाने पळत टोलनाका पर्यंत गेला. नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला माहिती समजताच त्यांनी टोलनाका येथे धाव घेऊन हल्लेखोर पवार यास ताब्यात घेतले.
 
घटनास्थळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, साह्ययक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे यांनी घटनास्थळी धाव घेतली व माहिती दिली. परिसरात अनेक बुवाबाजीचे प्रकार घडत असून पोलिसांनी त्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.