शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (08:01 IST)

एमपीएससी तिसऱ्या प्रयत्नात राज्यात पहिला

एमपीएससी आयोगाने पीएसआय पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. यात ५८३ युवकांची निवड केली. सुनील खचकड हा पहिला आला. सुनीलने शहरातील औरंगपुरा भागात पाच वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सुनीलचे वडील शेतकरी आहेत. त्याने कला शाखेत पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता.
 
२०१८, २०१९ साली झालेल्या पीएसआय पदाच्या परीक्षेत थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. मात्र, त्याने तिसऱ्या प्रयत्नात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. निकाल जाहीर झाला तेव्हा सुनील गावी गेलेला असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत मित्रांनी जल्लोष साजरा केला. सुनील याला एक भाऊ असून तो सुद्धा स्पर्धा परीक्षेचीच तयारी करीत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
 
परीक्षेच्या ५४० पैकी ४२७ गुण
 
सुनील याने पीएसआय पदासाठीच्या परीक्षेत एकुण ५४० गुणांपैकी ४२७ गुण प्राप्त झाले आहेत. त्याला लेखी परीक्षेत ४०० पैकी ३१३ गुण, शारीरिक चाचणी परीक्षेत १०० पैकी ८७ गुण आणि मुलाखतीत ४० पैकी २७ गुण मिळाले आहेत.