शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2023 (08:30 IST)

धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला अपघात; दोन ठार

accident
पालम : तालुक्यातील सरफराजपुर येथुन नागपूर येथे होणा-या धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी गेलेल्या आंदोलनकर्त्याच्या गाडीला दि.१२ रोजी झालेल्या अपघातात २ जागीच ठार असून ३ गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना अंजनखेड (जिल्हा यवतमाळ) या ठिकाणी घटली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
तालुक्यातील सरफराजपूर येथून नागपूर येथे होणा-या धनगर आरक्षण मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणा-या वाहनाला माहूर तालुक्यातील वाई बाजारपासून जवळच अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असलेल्या सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजनखेड जवळील पुलावर पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास स्वीफ्ट डिझायर एम.एच ०२ बी.पी. ९८३६ या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सरफराजपूर (ता. पालम जि. परभणी) येथील चालकासह ५ जण धनगर आरक्षण मोर्चात सामील होण्यासाठी नागपूर येथे गेले होते.
 
तेथून परतीच्या मार्गावर असताना वाटेत माहुर येथे देवदर्शन घेवून पालमकडे परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण धडकेत डिझायरच्या समोरील बाजूचा अक्षरश: चुराडा होवून यातील रमेश दत्तराव वाघमारे (५५) व लक्ष्मण पंडीत वाघमारे (३७) यांचा जागीच मृत्यू झाला. चालक रंगनाथ संपथराव वाघमारे, राम बालाजी बनसोडे, बापुराव मारोती वाघमारे यांना गंभीर दुखापत झाली आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळच्या शासकीय रूग्णालय दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टराकडुन सांगण्यात आले आहे