तडीपार सराईतांकडून नगर शहरात धुडगूस
अहमदनगर जिल्ह्याची प्रतिमा राज्यात गुन्हेगारी स्वरूपाची होऊ लागली आहे. शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. यामुळे गुंडगिरी प्रवृत्ती फोफावू लागली आहे. नुकतेच जिल्ह्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार विजय राजु पठारे, अजय राजु पठारे या पठारे बंधूंसह त्यांच्या इतर चार साथीदारांनी बालिकाश्रम रोडवरील कापड दुकान तसेच निलक्रांती चौकातील सायकल मार्टच्या दुकानात धुमाकूळ घालत कामगारांना मारहाण केली. या सराईत तडीपारांनी दहशत माजवत कामगारांकडून बळजबरी पैसे वसूल केले. या प्रकरणी पठारे बंधूंसह सहा जणांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.