Festival Posters
✕

"खोके सामनामध्ये पोहोचले का?" असा सवालच मनसेकडून करण्यात आला

Updated: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (15:59 IST)
 
"खोके सामनामध्ये पोहोचले का?" असा सवालच मनसेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे सरकारची जाहिरात सामनात छापून आल्याने त्यावरून निशाणा साधण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या जाहिरातीवरून ठाकरे गटाला टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "खोके सामनामध्ये पोहोचले का?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. 
 
सामनाच्या पहिल्या पानावर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात छापून आली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष… एका वर्षात 75,000 रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, असा या जाहिरातीवर मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी या महासंकल्प कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. 
 
या जाहिरातीत सर्वात वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. तर जाहिरातीच्या मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नियुक्तीपत्रांचं वाटप करतानाचा फोटो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची नावे आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पुण्यातील सारसबाग भागात तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

ऑस्ट्रेलियाला प्रवास करण्यासाठी व्हिसाचे नियम बदलले! भारतीयांना आता बोटांचे ठसे देणे आवश्यक असेल

गुजरातच्या बनासकांठा येथून पंतप्रधान मोदींनी पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता वितरित केला

LIVE: महाराष्ट्रात ८४ मसाला व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित

महाराष्ट्रात ८४ मसाला व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित, १९.७० कोटी रुपयांचे मसाले जप्त

पुढील लेख
Show comments