शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (20:52 IST)

दिंडोरी :बलात्कार प्रकरणातील संशयिताची पण आत्महत्या

death
दिंडोरी : तालुक्यातील पिंपळणारे येथील एका 20 वर्षीय तरुणीवर 27 सप्टेंबर रोजी बलात्कार करून संशयित फरार झाला होता.

दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथील पीडित युवतीने दिंडोरी पोलीस ठाण्यात उमेश खांदवे (वय 35) याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दिंडोरी पोलिसांनी उमेश खांदवे याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपीला 30 सप्टेंबर पर्यंत शिक्षा दिली होती. दरम्यान लघु शंकेच्या बहाण्याने उमेशने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तेव्हापासून तो फरार होता. त्यानंतर बलात्कार पीडित युवतीने विहिरीत आत्महत्या केली होती.
 
या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील बलात्कार पीडित युवतीच्या आत्महत्येनंतर फरारी असलेल्या संशयित आरोपीनेही त्यांच्या स्वतःच्या विहिरीत दगड बांधून आत्महत्या केल्याने दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
 
त्यानंतर फरारी आरोपी उमेश खांदवे याने पण त्यांच्या स्वतःच्या विहिरीत आत्महत्या केल्याने पिंपळणारे गावाबरोबर दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor