सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (07:21 IST)

दिपाली सय्यद पक्षप्रवेश रखडला

Dipali Sayyed
दिपाली सय्यद या आज ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात पक्षप्रवेश करणार होत्या. परंतु ऐनवेळी हा पक्षप्रवेश रद्द झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांनी दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विरोध करत आधी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. त्यात प्रदेश महिला जनरल सेक्रेटरी दिपाली मोकाशी, ठाण्यातील माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेबाबत नाराजी व्यक्त केली.
 
याबाबत दिपाली मोकाशी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिपाली सय्यद यांनी खालच्या शब्दात टीका केली होती. त्याचसोबत मविआ सरकार काळात सय्यद यांनी भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांविरोधात खोटी तक्रार दिली होती. आमचा सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला विरोध नाही. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल तर त्यांनी भाजपा नेत्यांची माफी मागावी आणि महिला आघाडीच्या नेत्यांविरोधातील खोटी तक्रार मागे घ्यावी असं त्यांनी सांगितले.