गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (18:29 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून खासदार नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सध्या अमरावतीत राजकारण तापलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमदार रवी राणा यांनी उभारला होता. तो पुतळा महापालिकेकडून हटवण्यात आला असून आता पुतळ्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. हा पुतळा आमदार रवी राणा यांनी परवानगीशिवाय उभारला होता. त्या कारणास्तव हा पुतळा हटवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटवल्याच्या कारणावरून महापालिकांचे आयुक्तांवर शाई फेकण्यात आली. या प्रकरणात आमदार रवी राणा आणि यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. 
अटकेच्या दरम्यान काही आरोपीना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे काही आरोपींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्या जखमी लोकांना भेट देण्यासाठी गेलेल्या खासदार नवनीत राणा आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे समजले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा हटवल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. सध्या त्याचे पडसाद दिसून येत आहे.