सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (16:24 IST)

सतत छेड काढणाऱ्या रोड रोमियोला मुलीने चांगले चोपले

मुलं काहीं न काही निमित्त काढून मुलींची छेड काढतात, परभणी मध्ये देखील सेलू तालुक्यात तळतुंबा गावात येथे एका महाविद्यालयीन तरुणीची सतत छेड काढणाऱ्या रोड रोमियोला मुलीने भर रस्त्यावर चांगले चोपून काढले.
 या गावात शिकणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची एक रोड रोमियो सतत छेड काढायचा आधी तर त्या तरुणीने दुर्लक्ष केले नंतर त्या रोड रोमियोंचे वर्तन अधिकच धाडसी होऊ लागले पाहून मुलीने त्या रोड रोमियोंची भर रस्त्यावर चांगलीच अद्दल काढली आणि त्याला चोपून काढले. तिने या रोड रोमियोला पट्ट्याने चांगलेच चोपले. या प्रकरणाची नोंद पोलिसात करण्यात आली नाही. त्या रोड रोमियोला समजावून सोडण्यात आले आहे. मुलीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.