सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (15:20 IST)

भयंकर, औषध विक्रेत्यावर दोन अज्ञात व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला

रायगड जिल्ह्यात पत्ता विचारण्याचा बहाणा करत औषध दुकानदारावर पिस्तुल रोखून गोळ्या घातल्या.शुक्रवारी मध्यरात्री माणगावमधील औषध विक्रेत्यावर दोन अज्ञात व्यक्तींना हा जीव घेणा हल्ला केला.  त्याच्या पोटात गोळी लागली असुन त्याला मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.  
 
शुभम जयस्वाल (24) असे जखमी औषध विक्रेत्याचे नाव आहे.काल मध्यरात्री शुभम जयस्वाल घरी जात असताना पल्सर मोटर सायकलवरून आलेल्या दोन अज्ञात वक्तींना पत्ता विचारण्यासाठी त्याला थांबवले. दरम्यान मागे बसलेल्या मोटर सायकल स्वाराने शुभमच्या पोटावर पिस्तुल रोखत गोळी झाडली. त्यानंतर हल्लेखोर पसार झालेत. 
 
या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला. हा हल्ला माणगावमधील कचेरी रस्त्यावर झाला. या प्रकारणी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.