सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (12:32 IST)

नितेश राणे आणि नवाब मलिक यांच्यातील वादाला खतपाणी

भाजपचे आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यातील वादाला सुरुवात झाली आहे. नितेश राणे यांनी विधिमंडळात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत असताना मांजरीचा आवाज काढून चिडवले होते .त्या नंतर शिवसेना आणि राणे यांच्यात वादाला सुरुवात झाली असता. आता या वादात नवाब मलिक यांनी देखील सहभाग घेत आपल्या ट्विटर अकाउंटवर मांजर आणि कोंबडीचा फोटो मार्फ करून शेअर केला आहे. आणि नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. नंतर नितेश राणे यांनी देखील नवाब मालिकांच्या ट्विटरला प्रत्युत्तर देत एका डुकराचा फोटो शेअर केला असून त्यात मलिक यांचा चेहरा मार्फ करण्यात आला असून ही प्रजाती फक्त भंगारात आढळते ओळख बघू कोण ?
असे कॅप्शन देण्यात आले होते. नितेश राणे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे