1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. doctor death by electric shower shock in Nashik

शॉवरचा शॉक लागून डॉक्टरचा मृत्यू

Nashik
आंघोळ करताना शॉवरमध्ये करंट उतरुन शॉक लागल्याने एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली असून  डॉ. आशिष काकडे असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
 
याप्रकरणात डॉ. आशिष काकडे यांच्या घरातून दुपारच्या सुमारास बाहेर पाणी येत असल्याचं सोसायटीतील रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यांनी घरात जाऊन बघितले असता, डॉ. काकडे बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी सरकारवाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. डॉ. काकडे यांच्या अंगावर भाजलेल्याचे व्रण होते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शॉक लागून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झाले.
 
डॉ. काकडे हे नाशिकच्या मोतिवाला महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. मूळचे ते तळोदा येथील असून, तळोद्याला त्यांचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत.
पुढील लेख
अबब, चंद्र दिसणार लाल रंगाचा