मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2019 (15:46 IST)

अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, उद्धव यांची टीका

Don't come like a rock in food
शरद पवार आमच्या १० रुपयांच्या जेवणावर टीका करत आहेत, पण त्यांची पोटं भरली आहेत आणि तुमची पोटं उपाशी आहेत. अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, अशी टीका शिवसेना अध्यक्ष  उद्धव ठाकरेनी केली आहे.'शरद पवारांनी दुष्काळी भागासाठी काय केलं? चारा छावणी आणि जनतेला पाणी नाही. शरद पवार आता बोंबलत फिरत आहेत. पण यापूर्वी पवारांनी हे का नाही केलं?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. 
 
बाळासाहेबांना अटक करणं ही चूक झाली, असं शरद पवार म्हणतात मग माफी का मागत नाही? असा प्रश्नही उद्धवनी विचारला.भाजपला पाठिंबा दिला नसता तर हे सरकार पडलं असतं. सरकार हलतं डुलतं झालं असतं. आमच्यामुळे हे सरकार तरलं. मी सत्तेत असूनही बोलतो. या सरकारच्या चांगल्या कामात शिवसेनेचाही वाटा आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. तसंच दुष्काळाचं चक्र भेदण्यासाठी वॉटर ग्रीड आणणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.