सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (07:26 IST)

राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय, अडकलोय : अजित पवार

आम्ही कधीपर्यंत खूर्चीवर, जनता सांगेल तोपर्यंत. जनता म्हणाली घरी बसा की आम्ही चाललो. पण सीईओ जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खूर्चीवर, शिवाय प्रमोशन होत जातं. राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय, अडकलोय. कुठे जाता येईना आणि बाहेरही पडता येईना,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
 
पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी करत विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला.
 
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यामुळे नवीन माध्यम स्वीकारलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. माझा उच्चार व्यवस्थित व्हावा, यासाठी मी मास्क काढला. नाहीतर तुम्हीच म्हणाल, या बाबानेच मास्क घातला नाही आणि आम्हाला सांगतोय, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी शाब्दिक फटकेबाजी केली.