सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2022 (20:48 IST)

कर्तव्यात कसूर करणारया डझनभर पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना निलंबित केले : चित्रा वाघ

chitra wagh
गेल्या अडीच वर्षाच्या काळात ठाकरे सरकार सत्तेत असतांना सतत कुठे ना कुठे महिला अत्याचार, विनयभंगाच्या घटना कानी येत. या घटनांमध्ये पुढे काय झाले कुणालाच माहीत नाही. केवळ गुन्हे दाखल करून तपास थंड बसत्यात पडून होते. मात्र शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर येताच महीलांसंबधी अत्याचार, विनयभंगाच्या केसेसमध्ये तपासात कसूर करणार्‍या डझनभर पोलीसांना सरकारने घरी पाठवले असा सांगत चुकीचे काम करणार्‍यांना यापुढे पाठीशी घालणार नाही असे भाजप महिला मार्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले. चित्रा वाघ यांनी शनिवारी नाशिकमध्ये पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची भेट घेत चर्चा केली. 
 
राज्यातील अत्याचाराच्या घटनांबाबत बोलतांना त्या म्हणाल्या की, मविआ सरकरच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. अडीच वर्षात आम्ही अनेकदा आंदोलने केली. माञ महाविकास आघाडी सरकारने आमचे त्यावेळी एकले नाही. आता आमचे सरकार आहे. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा केली जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही तत्काळ दखल घेत आतापर्यंत कर्तव्यात कसूर करणारया डझनभर पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना निलंबित केले असे सांगत शिंदे फडणवीस तातडीने कारवाई करतात असेही त्या म्हणाल्या. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात काय केले हे कोणी सांगावे असा सवाल वाघ यांनी केला. प्रत्येक वेळी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले मात्र मुळात राज्यात फास्ट ट्रॅक कोर्टच अस्तित्वात नाही त्यामुळे राज्यात महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. निश्चितपणे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी थेट भाष्य करणे टाळले. याबाबत आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली असून तीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor