शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (21:16 IST)

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, 34 टक्के महागाई भत्ता मिळणार

st buses
राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भांत राज्य सरकारने एसटी महामंडळाला पत्र सुद्धा पाठविले आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच 34 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागील काही काळापासून राखडला होता. राज्य सरकार कडून हा निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाली होती.
 
एसटी कामगार संघटना आक्रमक होत त्यांच्याकडून थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता असून, एसटी कर्मचाऱ्यांना मात्र 28 टक्के भत्ता देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना त्यावरच समाधान मानावे लागत होते. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.