1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (08:35 IST)

वाईन प्या असे म्हणूच शकत नाही; मद्यपानाला आरोग्य विभाग प्रोत्साहन देणार नाही

Drinking wine is not the same thing; The Department of Health will not promote alcoholism वाईन प्या असे म्हणूच शकत नाही; मद्यपानाला आरोग्य विभाग प्रोत्साहन देणार नाहीMarathi Regional News In Webdunia Marathi
महाविकास आघाडी सरकारच्या वतीने किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही वाईन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणार नाही. शेतकरी द्राक्ष बागायतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.आरोग्यमंत्री राजेश टोपे सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहात टोपे यांनी पत्रकारांना माहिती दिली.
 
ते म्हणाले, ज्या पद्धतीने सिगारेटवर लिहिले आहे की, धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे. परंतु तरीसुद्धा जगामध्ये या गोष्टी सूचना देऊन केल्या जातात किंवा विकल्या जातात. मला असं वाटतं की वाईन उद्योगाला खऱ्या अर्थाने शेतकरी द्राक्ष बागायतदार त्यांचे उत्पन्न, उत्पादन संदर्भाने घेतलेला हा निर्णय आहे. मद्यपानाला प्रोत्साहन देणारा निर्णय नाही, ते व्हावं अशी शासनाची अपेक्षा नाही, मार्केटिंगप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
 
कोरोनाची संख्या कमी होत आहे. तज्ञांच्या मते मार्च मध्यापर्यंत किंवा मार्चअखेरीस कोरोनाची तिसरी लाट आटोक्मयात येईल. तरीसुद्धा नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत असे ते म्हणाले.तसेच मास्क मुक्तीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले, की कोविड महामारी रोखण्यासाठी आयसीएमआर यांनी कार्य केले आहे. मास्क मुक्तीबाबत तेच निर्णय घेतील.