बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुल होत नसल्याने त्यांनी मुलीला पळवून नेले

जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा तब्बल ७ दिवसानंतर अखेर शोध लागला आहे. ग्रामीण पोलिसांनी तिला तिच्या आईकडे स्वाधीन केल आहे. लग्नाला सात वर्षे झाले तरी मुलबाळ होत नसल्याने त्यांनी पाळत ठेवून या मुलीला पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ते. सागर पांडुरंग खरात (मुळ गाव माळेगाव बुद्रुक, ता. बारामती, सध्या रा. कोलवडी ता़ हवेली) व त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, लिला ऊर्फ सुरेखा विनोद भैसारे (वय ३५, रा़ जेजुरी) या तिची लहान मुलगी जान्हवी विनोद भेसारे (वय दीड वर्षे) हिला घेऊन नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी एस टी बसस्टँडला जात होत्या. त्यावेळी कोणीतरी त्यांची नजर चुकवून मुलीला पळवून नेले.
 
स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर एका पल्सरवरील संशयितावर पोलिसांनी सर्व लक्ष केंद्रीत केले. आरोपीचे फोटो बनवून त्याआधारे बातमीदारांमार्फत चौकशी करण्यास सुरुवात केली़ तेव्हा या आरोपीचे नाव सागर पांडुरंग खरात (मुळ गाव माळेगाव बुद्रुक, ता़ बारामती, सध्या रा़ कोलवडी ता़ हवेली) असे असल्याचे समजले. तो हडपसर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला हडपसर येथून ताब्यात घेतले.